नाशिक : रस्त्याच्या कडेला असलेल्या शेततळ्यात पडून मुलाचा मृत्यू | पुढारी

नाशिक : रस्त्याच्या कडेला असलेल्या शेततळ्यात पडून मुलाचा मृत्यू

चांदवड : (जि. नाशिक) घरी जात असलेला 14 वर्षीय मुलगा रस्त्याच्या कडेला असलेल्या शेततळ्यात पडून मृत झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील धोडंबे गावात घडली. या घटनेबाबत वडनेरभैरव पोलिसांत आकस्मिक मृत्यूंची नोंद करण्यात आली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, धोडंबे येथील 14 वर्षीय पुष्कराज बापू रकिबे हा बुधवारी (दि. 3) सायंकाळी सहाला घरी चालला होता. यावेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या कैलास शंकर गवळी यांच्या शेततळ्यात डोकावून पाहात असताना पाय घसरून पडला.

त्याला लगेचच नागरिकांच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढून वडाळीभोई प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. वडनेरभैरवचे सहायक पोलिस निरीक्षक तायडे, पोलिस नाईक घुमरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.

हेही वाचा :

Back to top button