नाशिक : उपचाराच्या खर्चावरुन नातलगांचा रुग्णालयात गोंधळ, तिघांविरोधात गुन्हा | पुढारी

नाशिक : उपचाराच्या खर्चावरुन नातलगांचा रुग्णालयात गोंधळ, तिघांविरोधात गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

रुग्णाच्या उपचाराचा खर्च अवास्तव लावल्याचे कुरापत काढून नातलगांनी रुग्णालयात गोंधळ घातल्याचा प्रकार अशोका मार्गवरील खासगी रुग्णालयात घडला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात तिघांविरोधात महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था (हिंसाचार प्रतिबंध व नुकसान किंवा मालमत्तेचे नुकसान) अधिनियम, २०१० चे कलम चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. सुषमा प्रशांत भुतडा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित प्रवीण खैरे, वैशाली बनसोड व आणखी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार सुनीता प्रवीण खैरे यांना ३० जुलै रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. औषधोपचार व वैद्यकीय खर्च असे एकत्रित ४९ हजार ८४५ रुपयांचे बील झाले होते. संशयित प्रवीण खैरे, वैशाली बनसोड व आणखी एकाने आम्हाला न विचारता रुग्णाला गोळ्या औषधे दिली, जास्त बील लावले असा आरोप केला. त्यानंतर तिघांनी डॉ. भुतडा यांच्याशी जोरजोरात बोलून, दमदाटी करीत अंगावर धावून जात गोंधळ घातला. त्यामुळे डॉ. भुतडा यांनी मुबंईनाका पोलिस ठाण्यात तिघांविराेधात फिर्याद दाखल केली आहे.

हेही वाचा :

Back to top button