नाशिक : बनावट कागदपत्रांच्या आधारे इन्शुरन्स कंपनीलाच घातला गंडा | पुढारी

नाशिक : बनावट कागदपत्रांच्या आधारे इन्शुरन्स कंपनीलाच घातला गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वाहनाच्या इन्शुरन्स पॉलिसीच्या कागदपत्रांमध्ये खाडाखोड करून पॉलिसी वैध असल्याचे भासवून त्याचा वापर न्यायालयात करीत इन्शुरन्स कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिटी सेंटर मॉलजवळील एका वाहनविक्रीच्या मॉलमध्ये 16 जुलै 2017 रोजी हा प्रकार घडला होता. झहीर अजगर खान (40, रा. भायखळा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित बालाजी संतू तांबे (रा. जिव्हाळे, ता. निफाड) याने कंपनीची फसवणूक केली. झहीर यांच्या फिर्यादीनुसार एमएच 43, एएल 1160 क्रमांकाच्या कारचे मालक बालाजी तांबे यांनी न्यू इन्शुरन्स इंडिया कंपनीच्या पॉलिसीमध्ये फेरफार केले. पॉलिसीच्या नावात व वैधता तारीखमध्ये खाडाखोड करून ती स्वत:च्या नावे असल्याचे व पॉलिसी 15 जुलै 2017 पर्यंत वैध असल्याचे बनावट कागदपत्रे कोटक जनरल इन्शुरन्स कंपनीस सादर केली. या बनावट कागदपत्रांच्या आधारे तांबे यांनी नवीन पॉलिसी काढून तिचा वापर कोटक जनरल इन्शुरन्स कंपनीचे नुकसान करण्याच्या इराद्याने बनावट कागदपत्रे कोपरगाव येथील मोटार अपघात न्यायाधिकरण न्यायालयात सादर केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तांबे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button