नाशिक : कार अपघातात पती-पत्नीसह त्यांची 6 वर्षीय चिमुकली ठार, तिघांवर आज अंत्यसंस्कार

नाशिक : कार अपघातात पती-पत्नीसह त्यांची 6 वर्षीय चिमुकली ठार, तिघांवर आज अंत्यसंस्कार
Published on
Updated on

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
धुळ्याजवळ नरडाणा येथे चारचाकी व ट्रॅक्टरच्या अपघातात उत्तमनगरचे पती-पत्नी तसेच चालकही ठार झाल्याची घटना काल सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. उत्तमनगर येथील संदीप शिवाजी चव्हाण (43) व त्यांची पत्नी मीना संदीप चव्हाण (31) ठार झाले. त्यांच्या कारचा चालक हितेश अरुण चौधरी (28, रा. म्हसरूळ) हाही ठार झाला. चव्हाण यांना दोन मुली आणि मुलगा आहे. त्यांच्या दोघी मुली जखमी झाल्या होत्या. दरम्यान या अपघातातील त्यांची मुलगी परी (6) हिचे रात्री उपचार सुरु असताना निधन झाले.

पती पत्नी व त्यांची 6 वर्षीय मुलगी परी असे तिघांवरही आज सायंकाळी मोरवाडी अमरधाम येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. या घटनेने संपूर्ण नाशिक शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news