नाशिक मनपा आरक्षण सोडत, पहा थेट प्रक्षेपण | पुढारी

नाशिक मनपा आरक्षण सोडत, पहा थेट प्रक्षेपण

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राजकीय ओबीसी आरक्षण लागू केल्याने ओबीसी आरक्षणासह मनपा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मनपाच्या 133 पैकी 104 सर्वसाधारण जागांसाठी आज शुक्रवारी (दि.29) महाकवी कालिदास कलामंदिरात ओबीसींसह महिला आरक्षण सोडत काढण्यात येत आहे. महिलांसाठी फेरआरक्षण काढण्यात येणार असल्याने अनेकांचा जीव टांगणीला लागला असून, महिला आरक्षण पडल्यास अनेकांना निवडणूक रिंगणातून बाहेर पडण्याची वेळ येणार आहे.

नाशिक महानगरपालिकेतर्फे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत कार्यक्रमाचे मनपाच्यावतीने थेट प्रक्षेपण सुरु आहे.

Back to top button