Jalgaon : भुसावळ शहरातील सुविधांसाठी ५ कोटी मंजूर, 'ही' कामे होणार | पुढारी

Jalgaon : भुसावळ शहरातील सुविधांसाठी ५ कोटी मंजूर, 'ही' कामे होणार

जळगाव (भुसावळ) : भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नातून भुसावळ पालिका क्षेत्रातील विकास कामांसाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने ५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून रस्ता काँक्रिटीकरण, डांबरीकरण, मुख्य गटारींचे बांधकाम, पेव्हर ब्लॉक बसवणे अशी २९ कामे होणार असल्याने भुसावळकरांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

आमदार संजय सावकारे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या या कामांमध्ये शहरातील रामेश्वर कॉलनीत, आनंद नगरात, देना नगर, प्रभाग क्रमांक २२, तृप्ती डेअरी आनंद नगर परिसर, सिंधी कॉलनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते गांधी चौक परिसर, दीनदयाळनगर परिसर, हुडको कॉलनी महादेव मंदिर परिसर, ठाकूरसिंग बाबा मंदिर परिसर, हुडको कॉलनी, अयोध्या नगर, विकास कॉलनी, पियुष कॉलनी, म्युनिसिपल पार्क, प्रभाग १३, प्रल्हादनगर भाग, प्रभाग ४, मेथाजी मळा व परिसर, मरिमाता मंदिर, ताडीचा मळा भाग, जुने सतारे कोळीवाडा, विद्यानगर, काशिराम नगर, न्यू एरिया ब्राह्मण संघ, पोस्ट कार्यालय ते ठाकूर गल्ली, न्यू एरिया वॉर्ड सावकारे गल्लीत रस्ता काँक्रिटीकरण, डांबरीकरण, मुख्य गटारींचे बांधकाम, पेव्हर ब्लॉक बसवणे अशी विविध कामे होतील. याशिवाय पोलिस चौकी बांधकाम व सभागृहाचे बांधकामदेखील केले जाणार आहे.

हेही वाचा :

Back to top button