नाशिक शहरात ‘या’ ब्लॅकस्पॉटवर झाले सर्वाधिक मृत्यू ; वाहतुक पोलिसांचे सर्वेक्षण | पुढारी

नाशिक शहरात 'या' ब्लॅकस्पॉटवर झाले सर्वाधिक मृत्यू ; वाहतुक पोलिसांचे सर्वेक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहर वाहतूक शाखेने गेल्या तीन वर्षांत शहरात झालेल्या अपघातांवरून ब्लॅकस्पॉट शोधले आहेत. त्यात द्वारका सर्कल येथे 21 अपघातांमध्ये सर्वाधिक 15 जणांचा मृत्यू झाला आहे. वाहतूक पोलिसांच्या सर्वेक्षणात 15 ब्लॅकस्पॉट निष्पन्न झाले असून, त्यात 79 नागरिकांचा मृत्यू झाला.

द्वारका सर्कल येथे 2019 मध्ये चार अपघातांमध्ये एक, 2020 मध्ये एका अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. मात्र 2021 मध्ये 21 अपघातांमध्ये सर्वाधिक 13 जणांचा मृत्यू झाला. त्याखालोखाल चेहडीगाव फाटा, सातपूरच्या हद्दीतील एक्स्लो पॉइंट येथे प्रत्येकी सात-सात जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत ट्रक टर्मिनल येथे सहा अपघातांमध्ये सहा जणांनी जीव गमवला आहे. तर बळी मंदिर येथे चौघांचा अपघाती मृत्यू झाला आहे. शिंदे गाव शिवार येथे पाच, फेम सिग्नल येथे तीन, राऊ हॉटेल सिग्नल येथे पाच, के. के. वाघ कॉलेज समोर पाच, जत्रा हॉटेल चौफुली येथे तीन, उपनगर नाका सिग्नल येथे दोन, दत्तमंदिर सिग्नल येथे पाच, तारवाला नगर सिग्नल येथे तीन, गडकरी चौक सिग्नल येथे पाच व पळसेगाव बस थांबा येथील ब्लॅकस्पॉटवर चौघांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

हेही वाचा :

Back to top button