नाशिक : सप्तशृंगगड परिसरात मुसळधार, भात लावणीसाठी शेतकरी सरसावला | पुढारी

नाशिक : सप्तशृंगगड परिसरात मुसळधार, भात लावणीसाठी शेतकरी सरसावला

सप्तशृंगगड : पुढारी वृत्तसेवा
गत तीन दिवसांपासून सप्तशृंगगड परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून परिसरातील नद्या, नाले तुडुंब भरून वाहात आहेत, तर गावाला पाणीपुरवठा करणारा बंधारा ओसंडून वाहात आहे. या पावसाने शेतकरी सुखावला असून, सर्वत्र भात लावणीची लगबग दिसत आहे.

सप्तशृंगड परिसरात डोंगरावरून पडणारे पाणी आणि सर्वत्र हिरवळ नटल्याने सर्वत्र मनमोहक वातावरण दिसत आहे. पावसाचा जोर कायम असल्याने लहान – मोठे धबधबे खळाळत आहेत. नांदुरी, कातळगाव पिंप्री, गोबापूर, दरेगाव आदी गावांतील शेतांमध्ये पाणीच पाणी दिसत आहे. मार्कंडेश्वरजवळील पिंप्री येथील धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. वणी परिसर तसेच कळवणमधील पाणी गिरणा नदीत वाहून जात असल्याने या नद्या प्रावाहित झाल्या आहेत.

सप्तशृंगगड, नांदुरी परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर आहे. त्या अनुषंगाने भात शेतीची मशागत करून ठेवली आहे. भात लावण्यासाठी सुरुवात केली आहे.
– किरण आहिरे, शेतकरी

हेही वाचा :

 

Back to top button