नाशिक : जिल्ह्यातील सात नगर परिषदांत रणधुमाळी | पुढारी

नाशिक : जिल्ह्यातील सात नगर परिषदांत रणधुमाळी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील सिन्नर, मनमाड, येवला, चांदवड, नांदगाव, सटाणा आणि भगूर या नगर परिषदांचा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या सातही नगरपरिषदांमध्ये 18 ऑगस्टला मतदान तर दुसर्‍या दिवशी 19 ला मतमोजणी पार पडणार आहे. राज्यात सत्ता नाट्यानंतर पहिल्याच टप्प्यात नगर परिषदांचे धुमशान रंगणार असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

तीन आठवड्यांपासून महाराष्ट्रात राजकीय परिस्थितीत चढ-उतार सुरू असताना राज्य निवडणूक आयोगाने 92 नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम शुक्रवारी (दि. 8) घोषित केला. या नगरपरिषदांमध्ये जिल्ह्यातील सात नगरपरिषदांचा समावेश आहे. येत्या 20 तारखेला जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम घोषित करतील. तर 22 तारखेपासून नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहे. तसेच 18 ऑगस्टला मतदान तर लगेच 19 तारखेला मतमोजणी पार पडणार आहे. निवडणुका घोषित झाल्याने संबंधित नगरपरिषदा क्षेत्रांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे नगरपरिषदांचा निवडणूक कार्यक्रम लांबणीवर पडला होता. त्यामुळे इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली होती.

हेही वाचा :

Back to top button