Nashik Lasalgaon : कांदानगरीत तीव्र पाणीटंचाई, बारा ते पंधरा दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा | पुढारी

Nashik Lasalgaon : कांदानगरीत तीव्र पाणीटंचाई, बारा ते पंधरा दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
शहरातील नागरिक ऐन पावसाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरा जात आहे. तब्बल बारा ते पंधरा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यात भर म्हणजे पाइपलाइन फुटणे, महावितरणची बत्ती गूल होणे, मोटारी जळणे आदी कारणे पाणीटंचाईसाठी सांगितले जात आहे. त्यामुळे कांदानगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगावची ओळख आता भीषण पाणीटंचाईसाठी होत आहे.

येथील पाणीटंचाईचा प्रश्न सुटता सुटत नसून वर्षानुवर्षे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून सरपंच जयदत्त होळकर यांनी प्रयत्न करत नवीन पाइपलाइन मंजूर करून दिली. मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती बघता काम कधीपासून सुरू होईल आणि लासलगावकर भीषण पाणीटंचाईतून मुक्त होईल, असा प्रश्न आहे. हंडाभर पाण्यासाठी लहान मुलांना शाळा सोडून डोक्यावर हंडे घेऊन फिरावे लागते. दुर्दैवी चित्र दिसत आहे.

अनेक नागरिकांकडे तर पाणी साठवून ठेवण्याची व्यवस्था नसल्याने त्यांनी पाण्याचे नियोजन कसे करावे, महिन्यातून दोनदा ते तीनदा पाणीपुरवठा करण्यात येत असेल तर मग पूर्ण महिन्याचे पाणी बिल कशाला पाठविण्यात येते ? असा प्रश्न शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांनी केला आहे. लासलगाव ग्रामपालिकेत 17 सदस्य आहेत. मात्र, फक्त बोटावर मोजण्याइतकेच सक्रिय असल्याचे दिसत आहे. यावरून पाण्याबाबत पुढारी किती गंभीर आहे हे लक्षात येते.

हेही वाचा :

Back to top button