शिंदेंचे बंड : वणी येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांची रॅली | पुढारी

शिंदेंचे बंड : वणी येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांची रॅली

वणी (जि. नाशिक): पुढारी वृत्तसेवा

वणी येथे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी केलेल्या बंडाळीविरोधात शिवसैनिकांनी रॅली काढली. या रॅलीद्वारे शिवसैनिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे समर्थन करत बंडखोर आमदारांचा निषेध केला. शिवसेनेच्या आमदारांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्यात राजकीय परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. अशातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबर तळागाळातील शिवसैनिक खंबीरपणे पाठिंबा देत उभा आहे हे सिद्ध करण्यासाठी दिंडोरी, कळवण, सुरगाणा या तालुक्यातील शिवसैनिकांनी एकत्रित येत वणी शहरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ ही रॅली काढली.

वणी महाविद्यालयापासून काढण्यात आलेल्या या मोर्चाची सांगता वणी पोलीस ठाण्यात निवेदन देऊन करण्यात आली. मोर्चात सहभागी झालेल्या शिवसैनिकांनी बंडखोरांविरोधात घोषणा दिल्या. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या बरोबर होतो आणि शेवट पर्यंत त्यांच्यासोबत राहु अशी भावना शिवसैनिकांनी यावेळी व्यक्त केली.

प्रसंगी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी सुनिल पाटील, नाना मोरे, प्रविण जाधव, अॅड.विलास निरघुडे, मंगला भास्कर, मोहन गांगुर्डे, आंबादास जाधव, पांडुरंग गणोरे, नदिम सैय्यद, अस्मिता जोंधळे, उज्ज्वला बोराडे, शिवाजी शार्दुल, प्रदिप देशमुख, राजेंद्र जाधव, राकेश थोरात, जगन सताळे, निखिल जाधव, संतोष गवळी उपस्थित होते.

Back to top button