नाशिकच्या अभियंत्याकडून मांगीतुंगीत 12 फूट उंच चबुतरा | पुढारी

नाशिकच्या अभियंत्याकडून मांगीतुंगीत 12 फूट उंच चबुतरा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकचे स्ट्रक्चरल अभियंते मयूर जैन यांनी मांगीतुंगी येथे 10 दिवसांमध्ये 1,500 स्क्वेअर फूट रुंद आणि 12 फूट उंच अशी भगवंताची वेदी (चबुतरा) तयार करण्याचे अशक्य वाटणारे कार्य शक्य करून दाखविले आहे. त्यासाठी त्यांचा रवींद्रकीर्ती स्वामी यांनी विशेष पुरस्कार देऊन सन्मान केला.

भगवंताची मूर्ती 25 टनाची असून, ती ठेवण्यासाठी अतिशय मजबूत आरसीसी कार्य होणे गरजेचे होते. परंतु, वेळेची कमतरता आणि त्यात 8 जून रोजी कामाची सुरुवात झाली. 18 जूनला काम पूर्ण झाले. फक्त 10 दिवसांत हे काम करणे शक्य नाही, असे सांगून अनेक अभियंते येथून परतले. परंतु, हे शिवधनुष्य मयूर जैन यांनी उचलले व ते पूर्णत्वास नेले. मांगीतुंगीच्या पायथ्याशी भरत उद्यान बनविण्यात आले आहे. तेथे ऋषभदेवपुत्र भरत यांची 25 टनांची मूर्ती ठेवण्यात आली आहे. मयूर यांना इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर नाशिकतर्फे यावर्षीचा बेस्ट प्रॉमिसिंग इंजिनिअर अवॉर्डही मिळाला आहे. सगळ्यात लहान वयात चार्टर्ड इंजिनिअर बनण्याचा मान मयूर यांच्या नावावर आहे. यावेळी पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामी, महामंत्री संजय पापडीवाल, सी. आर. पाटील, डी. ए. पाटील, प्रतिष्ठाचार्य विजय जैन, जीवनप्रकश जैन, मुकेश जैन आदी पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौथर्‍यावर अडीच फूट उंचीचे लंबवर्तुळाकार कमळ आहे. त्यावर 11 फुटांची पद्मासनात बसलेली भव्य मूर्ती क्रेनने स्थापित करण्यात आली आहे. कमलासनाचे वजन 10 टन असून, मूर्तीचे वजन 15 टन आहे. बंगळुरू ग्रॅनाइटचा वापर करून जयपूरजवळच्या मकराना येथील कुशल कारागिरांनी ही कलाकृती घडविली आहे. हस्तिनापूर येथे माताजी चंदनामती व ज्ञानमती यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करून कमलासन व मूर्ती मांगीतुंगी येथे आणण्यात आली.

हेही वाचा :

Back to top button