नाशिक : मित्रावर धारदार शस्त्राने वार करून खून करणार्‍यास पोलिस कोठडी | पुढारी

नाशिक : मित्रावर धारदार शस्त्राने वार करून खून करणार्‍यास पोलिस कोठडी

नाशिक : वादातून मित्रावर धारदार शस्त्राने वार करून खून करणार्‍या संशयितास न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि.6) पोलिस कोठडी सुनावली आहे. अतुल अजय सिंग (रा. सोमेश्वर कॉलनी) असे या संशयिताचे आहे.

अतुल याने बुधवारी (दि.1) सकाळी सातपूर-गंगापूर कॅनॉल रोड परिसरात त्याचा मित्र पवन नथू पगारे (रा. कानिफनाथनगर, सातपूर कॉलनी) याचा खून केला होता. या प्रकरणी खैरनार यांच्या फिर्यादीनुसार गंगापूर पोलिस ठाण्यात अतुलविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी अतुलला गुरुवारी (दि.2) न्यायालयात हजर केले असता त्यास सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा :

Back to top button