नाशिक : शहरात दोघांची गळफास घेत आत्महत्या | पुढारी

नाशिक : शहरात दोघांची गळफास घेत आत्महत्या

नाशिक : शहरात दोघांनी गळफास घेत आत्महत्या केली. पहिल्या घटनेत देवळाली कॅम्प येथील अजगरअली चाळ परिसरात राहणार्‍या 39 वर्षीय कैलास भास्कर लकारे यांनी गळफास घेतल्याचे मंगळवारी (दि.31) सकाळी आढळून आले. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

तर दुसर्‍या घटनेत गंजमाळ येथील भीमवाडी येथे राहणार्‍या सुरेश बाबूराव लहानगे (37) यांनी मंगळवारी सकाळी राहत्या घरात गळफास घेतल्याचे आढळून आले. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button