नाशिक ते दिल्ली ट्रॅक्टर मोर्चा रद्द, मागण्यांसाठी शासकीय कार्यालया समवेत बैठक : दातीर | पुढारी

नाशिक ते दिल्ली ट्रॅक्टर मोर्चा रद्द, मागण्यांसाठी शासकीय कार्यालया समवेत बैठक : दातीर

नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा

प्रकल्पग्रस्त शेतक – यांच्या भुखंड चौकशी मागण्यांसाठी नाशिक ते दिल्ली राष्ट्रपती भवन पर्यंत ट्रॅक्टर मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली व ट्रॅक्टर ताब्यात घेतले. या नंतर महाराष्ट्र औदयोगीक विकास महामंडळ सह इतर विभागा समवेत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर ट्रॅक्टर मोर्चा रद्द केला असल्याची माहिती अंबड येथील प्रकल्पग्रस्त बचाव संघर्ष समिती चे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी दिली.

पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक ते दिल्ली राष्ट्रपती भवन या ट्रॅक्टर रॅलीला परवानगी नाकारली. या नंतर अंबड येथून सोमवारी सायंकाळी दातीर हे एक ट्रँक्टर घेऊन दिल्लीकडे रवाना होणार होते. याची माहिती अंबड पोलिसांना समजली, या नंतर अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी व कर्मचारी पथकाने अंबड भागातील दातीर यांच्या निवासस्थानी जाऊन साहेबराव दातीर यांना ताब्यात घेतले व ट्रॅक्टर अंबड पोलिस ठाणे येथे आणले. यावेळी पोलिसांनी दातीर यांचे मन वळविले व प्रकल्पग्रस्त शेतक – यांच्या भुखंड चौकशी मागण्यांसाठी प्रादेशिक अधिकारी महाराष्ट् राज्य औद्योगिक विकास महामंडळ नाशिक जिल्हा उदयोग केंद्र, कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सुमित कंपनी चे भुखंड घेणारे व्यवसायिक यांच्या समवेत बैठक घेऊन देण्याचे आश्वासन अंबड पोलिसांनी साहेबराव दातीर यांना दिले. या नंतर टँक्टर मोर्चा रद्द केला असल्याची माहिती प्रकल्पग्रस्त बचाव संघर्ष समिती चे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी दिली.

प्रकल्पग्रस्त शेतक – यांच्या भुखंड चौकशी मागण्यांसाठी एमआयडीसी समवेत इतर कार्यालय समवेत बैठक लाऊन द्यावी असे पत्र दातीर यांनी दिले. तर संबधीत कार्यालयांना बैठक घेण्याबाबत पत्र पाठविणार आहे.
– भगीरथ देशमुख
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबड

हेही वाचा :

Back to top button