नाशिकच्या सिडकोत अनधिकृतपणे नशेच्या गोळ्यांची विक्री, राष्ट्रवादीकडून कारवाईची मागणी | पुढारी

नाशिकच्या सिडकोत अनधिकृतपणे नशेच्या गोळ्यांची विक्री, राष्ट्रवादीकडून कारवाईची मागणी

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा ; सिडकोतील औषध विक्रेत्यांकडून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कुत्ता नशाच्या गोळ्यांची विक्री होत असल्याने गुन्हेगारी वाढली आहे. अशा मेडिकल दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी अन्न औषध प्रशासनच्या सहायक आयुक्तांकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सिडको विभागाने निवेदनाद्वारे केली आहे.

राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष अंकुश वराडे, शहर सरचिटणीस मुकेश शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको विभाग कार्याध्यक्ष राहुल कमानकर, कृष्णा काळे, संतोष भुजबळ, हरिष महाजन, अक्षय परदेशी, हर्षल चव्हाण, नितीन अमृतकर, विक्रांत डहाळे, अक्षय पाटील, सुबोध नागपुरे यांनी अन्न औषध प्रशासनाचे सहायक आयुक्तांची भेट घेत निवेदन दिले. निवेदनानुसार, सिडकोतील काही मेडिकल दुकानदारांकडून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अनधिकृतपणे कुत्ता नशाच्या गोळ्यांची सर्रासपणे विक्री केली जात आहे. त्यामुळे गुन्हेगारी वाढली असून, अशा मेडिकल दुकानदारांवर कारवाईची मागणी केली.

हेही वाचा :

Back to top button