नाशिक : चालकाचे नियंत्रन सुटल्याने वाहनाचा अपघात ; २० मजूर जखमी

नाशिक : चालकाचे नियंत्रन सुटल्याने वाहनाचा अपघात ; २० मजूर जखमी
Published on
Updated on

नांदगाव (नाशिक), पुढारी वृत्‍तसेवा : नांदगाव येथील न्यायडोंगरी रोडवर ऊसतोड मालवाहतूक ट्रक कामगारांना घेवून जाताना पलटी झाला. ही घटना रविवारी (दि. ८) रात्री १०: ३० च्या सुमारास घडली. यामध्ये सुमारे १८ ते २० मजूर जखमी झाले आहेत. तर ३ जणांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी तात्‍काळ जखमींना नांदगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, नारायणगाव पुणे येथील साखर कारखान्यावर कामाला गेलेले मजूर गावी परतत होते. चालकाचे  नियंत्रण सुटल्‍याने बाभुळवाडी फाट्यावर ट्रक पलटी झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. शहरातील खाजगी व सरकारी डॉक्टर जखमीवर उपचार करत आहेत.

या अपघतात गंभीर जखमींना बाहेरगावी हलविण्यात आले असून यामध्ये महिला लहान मुले, मुली व काही पुरुषांचा समावेश आहे. तर या ट्रकमध्ये २५ व्यक्ती प्रवास करीत होते. सदर वाहन चालकाने मद्य प्राशन करुन गाडी चालवत होता, असे जखमींनी पोलिसांना सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news