

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी तालुक्यातील बोपेगाव येथे अक्षय तृतीयेपासून पारंपारिक बोहडा उत्सवास सुरुवात झाली. शंभर वर्षांपूर्वीपेक्षा जास्त वर्षाची या उत्सवाला परंपरा आहे. पाच वर्षांच्या खंडानंतर यावर्षी हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. सात दिवसाच्या दैनंदिन कार्यक्रमात दिंडोरीचे आमदार व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनीही सहभाग घेतला.
यावेळी नरहरी झिरवाळ यांनी पांडवाचे मुखवटे आपल्या डोक्यात घालुन संबळवर ठेका धरत बोहडा उत्सवात हजेरी लावली. यावेळी संबळाच्या ठेक्यावर त्यांनी नृत्य केले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.