नाशिक : इमारतीवरून पडल्याने युवकाचा मृत्यू | पुढारी

नाशिक : इमारतीवरून पडल्याने युवकाचा मृत्यू

नाशिक : इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडल्याने युवकाच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आनंदवल्ली परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवा संजय वाजे (१६, रा. ट्रॉफिकानो अपार्टमेंट, सिरीन मिडोज, आनंदवल्ली, गंगापूर रोड) हा राहत्या घराच्या बाहेरच्या खिडकीच्या मोकळ्या जागेतून तोल जाऊन जमिनीवर पडला. देवाच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button