नाशिक : जवाहर सुतगिरणीत आग, सुमारे ८ लाखांचा कापूस जळून खाक | पुढारी

नाशिक : जवाहर सुतगिरणीत आग, सुमारे ८ लाखांचा कापूस जळून खाक

धुळे ; पुढारी वृत्तसेवा धुळे तालुक्‍यातील मोराने शिवारात असलेल्या जवाहर सुत गिरणीला लागलेल्या आगीत सुमारे आठ लाख रुपयांचा कापूस जळून खाक झाला. या घटनेची नाेंद तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे.

धुळे तालुक्यातील मोराणे शिवारात असलेल्या जवाहर सहकारी सूत गिरणीच्या कामगारांनी आज (गुरूवार) सकाळी काम सुरू केले. यावेळी स्पिनिंग विभागा जवळील एक गोदामात मशीनमध्ये स्पार्किंग झाल्यामुळे कापसाला आग लागली. ही बाब लक्षात येताच सूतगिरणी मधील फायर सिस्टिमला माहिती देऊन तातडीने अग्नी प्रतिबधक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.

मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. त्यामुळे ही माहिती धुळे महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानुसार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. या पथकाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सुमारे एक तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र तोपर्यंत आठ लाखाचा कापूस जळून खाक झाल्याची माहिती सूतगिरणीचे कार्यकारी संचालक विश्वासराव ठाकरे यांनी दिली. दरम्यान या संदर्भात तालुका पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली.

Back to top button