भुसावळमध्‍ये फ्लॅटला आग; वडिलांचा मृत्‍यू, मुलगा गंभीर | पुढारी

भुसावळमध्‍ये फ्लॅटला आग; वडिलांचा मृत्‍यू, मुलगा गंभीर

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : भुसावळ शहरातील महेश कॉलनी परिसरातील एका फ्लॅटला आज (दि. २६ ) पहाटे साडेचारच्या सुमारास लागलेल्या आगीत एक जणाचा मृत्यू झाला. तर एकजण जखमी झाला आहे. या आगीत केशवलाल वाधवाणी (वय ५५ ) यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा लखन वाधवाणी हा गंभीररित्या जखमी झाला आहे.

सविस्तर मिळालेली माहिती अशी की , भुसावळ शहरातील महेश कॉलनीतील निकुंज अपार्टमध्यमध्ये दुसऱ्या मजल्यावर केशवलाल वाधवाणी हे आपल्या कुटुंबासह राहतात.  पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास त्यांच्या फ्लॅटमधून आरोळ्या ऐकू आल्या. आगीच्या ज्वाला आणि धूर बाहेर निघू लागला.  इमारतीमधील रहिवाशांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्‍यांनी अग्निशमन दल आणि बाजारपेठ पोलिसांना या घटनेची  माहिती दिली. अग्निशमन दलाच्या  पथकाच्‍या प्रयत्नांनी आग आटोक्यात आली.

दरम्यान, जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी येथे धाव घेऊन मदतकार्य केले. नगरसेवक महेंद्रसिंह उर्फ पिंटू ठाकूर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य केले. आग नेमकी कशी लागली. याबाबत माहिती अद्‍याप समोर आलेली नाही.

हेही वाचलंत का ?  

Back to top button