नाशिक : झोपडीत घूसून बिबट्याने महिलेला केले ठार | पुढारी

नाशिक : झोपडीत घूसून बिबट्याने महिलेला केले ठार

नाशिक (घोटी/इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा
चिंचलखैरे येथे झोपडीत राहणार्‍या 55 वर्षीय महिलेचा बिबट्याच्या हल्यात मृत्यू झाला आहे. शकुंतला अमृता रेरे असे मृत महिलेचे नाव आहे.

शकुंतला रेरे या शेतातील झोपडीत झोपलेल्या असताना रात्री 9 च्या सुमारास बिबट्याने झोपडीत घुसून त्यांना फरपटत नेत ठार केले. याबाबत माहिती समजताच इगतपुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारी, वनपरिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव यांनी पथकासह भेट देऊन माहिती घेतली. संबंधित कुटुंबाला नियमाप्रमाणे योग्य ते साहाय्य करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा ;

Back to top button