नाशिक : विद्यार्थिनीसोबत असभ्य वर्तन करणार्‍यास सहा महिने कारावास | पुढारी

नाशिक : विद्यार्थिनीसोबत असभ्य वर्तन करणार्‍यास सहा महिने कारावास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाविद्यालयात विद्यार्थिनीसोबत असभ्य वर्तन करून तिला मारहाण करणार्‍या आरोपीस न्यायालयाने सहा महिने कारावास आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. नरेश भीमराज परमार (23, रा. पाटीलनगर, सिडको) असे या आरोपीचे नाव आहे.

नरेश परमार हा 12 एप्रिल 2012 रोजी शहरातील एका महाविद्यालयाच्या स्वच्छतागृहाबाहेर थांबला होता. तेथून पीडिता बाहेर येताच त्याने तिच्यासोबत असभ्य वर्तन केले. पीडितेने त्यास विरोध केल्यानंतर नरेशने तिला मारहाण केली. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात नरेशविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन तपासी अधिकारी पोलिस अंमलदार एम. ए. काझी यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. फिरोज शेख यांनी युक्तिवाद केला. नरेशविरोधात गुन्हा सिद्ध झाल्याने मुख्य न्यायदंडाधिकारी एम. ए. गादिया यांनी नरेशला शिक्षा ठोठावली आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस अंमलदार बी. आर. कापडणीस, व्ही. पी. पाटील यांनी कामकाज केले.

Back to top button