एरोडल : चारचाकीच्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू | पुढारी

एरोडल : चारचाकीच्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : एरोडल तालुक्यातील पिंपळकोठा येथे उभ्या ट्रकला भरधाव वेगात असणाऱ्या चारचाकीचे धडक दिली. चारचाकीतील ४ जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

समोर आलेली माहिती अशी की, एरंडोलकडून जळगावकडे जात असलेली चारचाकीने (MM 19 CZ 7360) पिंपळकोठ्याजवळ उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. कारमधील चौघांचा जागीच जागीच मृत्यू झाला. तर, एक जण गंभीर जखमी आहे. यामध्ये चालक चतरसिंग पद्मसिंह परदेशी (वय- 40), विजयसिंग हरी परदेशी (वय-65), जयदीप मदनसिंग परदेशी (वय-37 सर्व रा. जामडी ता. चाळीसगाव) आणि रवींद्र रामचंद्र पाटील (वय-55, वडजी ता.भडगाव) यांचा मृत्यू झाला आहे.

हा अपघात इतका भीषण होता की, ट्रकमध्ये घुसलेल्या चारचाकीला आणि त्यातील मृत पावलेल्या व्यक्तींना काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला जळगाव जिल्हा शासकीय रूग्णालयात रवाना करण्यात आले आहे. यावेळी सुमारे १ तास वाहतूकीचा खोळंबा झाला होता. या घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि पाळधी येथील वाहतूक पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

Back to top button