जळगाव : चार गावठी कट्टे, पाच जिवंत काडतुसांसह आरोपी ताब्यात | पुढारी

जळगाव : चार गावठी कट्टे, पाच जिवंत काडतुसांसह आरोपी ताब्यात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : मध्य प्रदेशमधील एक इसम भुसावळमध्ये मोठ्या प्रमाणात गावठी शस्त्र घेऊन येत असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चार गावठी कट्टे, पाच जिवंत काडतुसे असा एकूण १ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

भुसावळ शहरात गावठी कट्टा विक्रीसाठी मध्य प्रदेशमधून आलेली व्यक्ती बसस्थानक परिसरात असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून संशयिताच्या रविवारी (दि.२०) रात्री १०.३० च्या सुमारास दीपसिंह गुरुमुखसिंह कलाणी (२०, तितराण्या, हेलापटाव, जि. खरगोन, मध्य प्रदेश) यास ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता पांढऱ्या पिशवीत चार गावठी कट्टे व जीन्स पॅन्टच्या खिशातून ५ जिवंत काडतुसे असा १ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button