नाशिकरोडला भीषण अपघात ; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू | पुढारी

नाशिकरोडला भीषण अपघात ; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

नाशिक पुढारी वृत्तसेवा : नाशिक पुणे महामार्गावर दत्तमंदिर चौक येथे सद्गुरू हाॅटेल समोर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अज्ञान वाहनचालक हा पसार झाला असून उपनगर पोलिस तपास करत आहेत.

ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील महिला व पुरुष या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

Back to top button