नाशिक : शेतकरी संघर्ष संघटनेचा वाहनांच्या लिलावास विरोध ; कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात | पुढारी

नाशिक : शेतकरी संघर्ष संघटनेचा वाहनांच्या लिलावास विरोध ; कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

नाशिक पुढारी वृत्तसेवा : नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने कर्ज -थकबाकीमुळे आतापर्यंत 238 वाहन, ट्रॅक्टर जप्त केलेले आहेत. कर्जाचे हप्ते थकल्यामुळे या वाहनांचा आज 4 फेब्रुवारीपासून टप्प्याटप्प्याने जाहीर लिलाव होणार आहे. 113 ट्रक्टरचा जाहीर लिलाव जिल्हा बॅंक करणार आहे. या लिलावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेने थकबाकीदारांना एक आवाहन सुध्दा केले आहे. त्यात म्हटले आहे की, जिह्यातील थकबाकीदार सभासदांनी अशाप्रकारची कटू कायदेशीर कारवाई टाळून आपला थकबाकीचा भरणा लवकरात लवकर करून बँकेस सहकार्य करावे. मात्र आजपासून सुरु झालेल्या या लिलावाला शेतकरी संघर्ष संघटनेकडून विरोध करण्यात आला.

राहुल गांधी गोव्यात दाखल, घरोघरी सुरु केला प्रचार

आज जिल्हा बॅंक परिसरात संघटनेच्या अऩेक शेतक-यांनी या लिलावाला विरोध करण्यासाठी आंदोलन छेडले. जप्त केलेल्या ट्रक्टरसह वाहनांचा लिलाव होऊ देणार ऩाही असा पवित्रा घेत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाबॅंकेबाहेर जोरदार आंदोलन सुरु केले. आज आंदोलन स्थळी परिस्थिती चिघळताच मुंबई नाका पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत पोलीस स्टेशनला नेले आहे.

Back to top button