महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलली | पुढारी

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलली

मुंबई :

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा अखेर पुढे ढकलण्यात आली आहे. 86 उमेदवारांनी उत्तरतालिकेसंदर्भात न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील निर्णयामुळेच आयोगाला हे करावे लागले. न्यायालयीन निकालानुसार पूर्वनियोजित उमेदवारांपेक्षा अधिक जणांना परीक्षेत प्रवेश द्यावा लागणार आहे.

आयोगाने छापलेल्या प्रश्‍नपत्रिका व उत्तरपत्रिकांवर वाढीव उमेदवारांसह परीक्षा घेणे अशक्य असल्याने 29 जानेवारी, 5 फेब्रुवारी आणि 12 फेब्रुवारीला होणारी परीक्षा नव्या निर्णयापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

Back to top button