सावानाचे माजी अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांचे निधन | पुढारी

सावानाचे माजी अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांचे निधन

नाशिक : ऑनलाई डेस्क : येथील सार्वजनिक वाचनालयाचे माजी अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांचे आज निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. पंचवटी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून ते कार्यरत होते. त्यांनी 10 वर्ष सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्षपद भूषविले. आज सकाळी वयाच्या 73 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांना आज दुपारी अंतिम निरोप देण्यात येणार आहे. सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने अभिवादन करण्यासाठी दुपारी तीन वाजता त्यांची अंत्ययात्रा परशुराम सायखेडकर नाट्यगृहाच्या आवारात येईल. यावेळी वाचनालयाच्या वतीने त्यांना पुष्पचक्र अर्पण करण्यात येणार आहे. सार्वजनिक वाचनालयाचे सभासद, विश्वस्त, कर्मचारी आणि नाशिक शहरातील समाजसेवक यावेळी उपस्थित राहणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावाना आवारात त्यांचे अंत्यदर्शन घेता येणार आहे.

Back to top button