जळगाव : १२ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या | पुढारी

जळगाव : १२ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव ; पुढारी वृत्‍तसेवा

येथील कांचन नगरमध्ये राहणाऱ्या बारा वर्षीय मुलाने काही कारणावरून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज (शुक्रवार) मकर संक्रांतीच्या दिवशी उघडकीस आली. शासकीय रुग्णालयात मुलाच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला होता.

यश रमेश राजपूत (वय १३, रा.कांचन नगर) असे मृत मुलाचे नाव आहे. सकाळी राहत्या घरी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. यशचे वडील रमेश सुकलाल राजपूत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बारदानचे काम करतात.

घटनास्थळी शनीपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन माहिती घेतली. मुलाने मकर संक्रांतीच्या दिवशी गळफास घेतल्यामुळे शहरात शोककळा पसरली आहे. पतंग उडवू दिला नाही म्हणून मुलाने गळफास घेतल्याची माहिती समजत आहे. मात्र अधिकृत अशी कोणतीही माहिती अद्‍याप नाही.

Back to top button