दिल्ली : गाझीपूर बाजारात सापडली स्फोटकांची बॅग - पुढारी

दिल्ली : गाझीपूर बाजारात सापडली स्फोटकांची बॅग

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : पूर्व दिल्लीच्या गाजीपूर फुलबाजारात फाटक क्रमांक दोनच्या बाहेर एक बेवारस बॅग मिळाल्यामुळे परिसरात गोंधळ उडाला. बॅग आढळ्याची सुचना पीसीआर काॅलवरून सकाळी १०.२० वाजता मिळाली होती. त्यानंतक पोलीस, एनएसजीच्या टीमबरोबर बाॅम्ब स्काॅडच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या. बॅग उघडल्यानंतर आतमध्ये बाॅम्ब आढळून आला.

पहिल्यांना बाॅम्ब निकामी पथकाने बाॅम्ब निष्क्रिय करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यात यश आले नाही, त्यामुळे एका खड्ड्यात बाॅम्ब घालून त्याला उडवून देण्यात आले आणि अशाप्रकारे निष्क्रिय करण्यात आले. दिल्ली पोलीस अधिकारी विनीत कुमार यांनी सांगितले की, “बेवारस बॅगमध्ये बाॅम्ब सापडल्याची बातमी मिळताच एनएसजीची टीम ताबडतोब घटनास्थळी दाखल झाली आणि परिसरात रिकामा केला. लोकांच्या सुरक्षेचा विचार करता फूल बाजारदेखील रिकामं करण्यात आलं. संपूर्ण परिसरात लोकांना येण्यास बंदी घातली.”

बाॅम्ब निकामी पथकाने बाॅम्बला पहिल्यांदा निष्क्रिय करण्यासाठी बाहेर प्रयत्न केला. त्यासाठी बाॅम्बला रोबोटिक कंटेनरमध्ये ठेवण्यात आले. नंतर कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता बाॅम्बला खड्ड्यात घालून जोरदार धमाका करून बाॅम्ब निकामी करण्यात आला.

बॅग मिळाल्यानंतर दिल्ली पोलीस आजुबाजुच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत आणि त्यातून घटनास्थळी कुणी बॅग ठेवली याचा तपास करत आहेत. पोलिसांना काही जणांवर संशय आहे, त्याचा पोलीस तपास करत आहेत. बाॅम्ब असल्याची माहिती मिळताच पोलीस दल त्वरीत पोहोचले आणि संपूर्ण परिसर सील करण्यात आला.

Back to top button