सायबर दहशतवाद; राज्यात पहिली जन्मठेप

सायबर दहशतवाद; राज्यात पहिली जन्मठेप

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : सायबर दहशतवादाच्या आरोपाखाली राज्य दहशतवाद विरोधी पथकाने गजाआड केलेल्या 28 वर्षीय संगणक अभियंता अनीस अन्सारी याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सायबर दहशतवादाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा होण्याचे राज्यातील हे पहिलेच प्रकरण आहे.

मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील अमेरिकन शाळेवर दहशतवादी हल्ला करुन मुले आणि विदेशी नागरीकांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अन्सारी याला एटीएसने 2014 मध्ये अटक केली होती. राज्य एटीएसने एका गोपनीय माहितीच्या आधारे ऑक्टोबर 2014 मध्ये कारवाई करत अन्सारी याला अटक केली होती. त्याच्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 43, 66 सह 66 (अ) (अ), सह 66 (फ) यासह भादंवि कलम 120 (ब), 115 सह 302 अन्वये गुन्हा दाखल करुन एटीएसने तपास करत विशेष सत्र न्यायालयात जानेवारी 2015 मध्ये दोषारोपपत्र दाखल केले. यात अन्सारी याच्यावर मलोन वुल्फफ हल्ल्यात थर्माईट बॉम्ब वापरण्याची योजना आखल्याचा आरोप होता. असोसिएट जिओग्राफिक टेक्निशियन म्हणून काम करत असताना अन्सारीने कंपनीचा संगणक वापरला होता आणि उसैरिम लोगान या बनावट नावाने खोटे फेसबूक खाते सुरू केले होते.

न्यायमूर्ती जोगळेकर यांनी शुक्रवारी याप्रकरणात आरोपी अन्सारी याला सायबर दहशतवादाशी संबंधित माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (फ) आणि 43 (अ), तर, भादंवि कलम 115 आणि 120 (ब) अंतर्गत त्याला दोषी ठरवून सश्रम आजन्म कारावास आणि 35 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अन्सारी याCyber terrorismला दोषी ठरवताना, न्यायमूर्ती जोगळेकर म्हणाले की, 13 ते 18 ऑक्टोबर 2014 पर्यंत अन्सारी हा एका ओमर एलहाज नावाच्या व्यक्तीच्या सतत संपर्कात होता. परदेशी नागरिकांच्या मुलांचा मृत्यू होण्याच्या हेतूने आणि दहशत निर्माण करण्याच्या चुकीच्या हेतूने अमेरिकन शाळेवर बॉम्ब हल्ला करण्याचा कट रचण्यासाठी डेटा किंवा माहिती ओमर एलहाज याला पाठविली होती.

भारताची एकता आणि सार्वभौमत्व धोक्यात आणण्याच्या किंवा दहशतवादी हल्ला करण्याच्या हेतूने प्रतिबंधित आयएसचे आक्षेपार्ह संदेश आणि विचारधारा पाठवत होता. सीप्झमध्ये काम करत असलेल्या अन्सारी याने खाजगी कंपनीच्या संगणक आणि इंटरनेटचा गैरवापर केला होता. तसेच, आरोपीने थर्माईट बॉम्ब बनवण्याबाबत माहिती मिळवली होती. अधिकृत प्रवेशाची मर्यादा ओलांडून आणि भारताच्या अखंडतेला आणि सार्वभौमत्वाला धोका असल्याने हे प्रकरण सायबर दहशतवादाच्या कक्षेत असल्याचेही न्या. नमूद केले. तर, तपशीलवार निकालाच्या प्रतीमध्ये, न्यायाधीशांनी त्या चॅट्सचा संदर्भ दिला आहे. ज्यामध्ये लोगानने मुंबईतील अनेक लक्ष्ये, विशेषतः दूतावास आणि शाळांबद्दल बोलले होते. अन्सारीने खात्यासाठी पासवर्ड दिला होता.

25 साथीदारांचे जबाब

आरोपी अन्सारी हा एक संगणक अभियंता आहे. गुन्हा अत्यंत कुशल आणि तांत्रिक आहे. जिथे त्याचे कौशल्य कामी आले. गुन्ह्याचे गांभीर्य आणि तीव्रता लक्षात घेता, जर यात सौम्यता दाखवली गेली तर, आरोपी पुन्हा गुन्हा करण्याची शक्यता आहे. यासाठी सायबर तज्ज्ञ, अन्सारीचे सहकारी, वरिष्ठ तसेच, नेहरू नगर, कुर्ला (पूर्व) येथील त्यांचे शेजारी अशा 25 साक्षीदारांचे जबाब आणि पुरावे न्यायालयासमोर मांडत विशेष सरकारी वकील मधुकर दळवी यांनी अन्सारीच्या आजीवन कारावासाची मागणी केली.

शाळेवर करायचा होता 'लोन वुल्फ' हल्ला

अमेरिकेतील रहिवासी समजल्या जाणार्‍या इल्हाजीसोबतच्या
साइटवरील त्याच्या चॅट्सवरून असे दिसून आले की, त्याला शाळेवर 'लोन
वुल्फ' हल्ला करायचा होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्यासमोर चाललेल्या खटल्यात दहशतवाद विरोधी पथकाने सबळ पुरावे आणि कागदपत्रे सादर केली. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. ए.जोगळेकर यांच्यासमोर सरकारी आणि बचाव पक्षाने युक्तीवाद केले. यात प्रतिबंधित दहशतवादी संघटना आयएसद्वारे सराव, प्रचार आणि प्रचार केल्यानुसार दहशतवादी कृत्ये आणि क्रियाकलाप करण्याचा कट रचला गेला आहे.

शिक्षा कमी करण्याची मागणी फेटाळली

अन्सारीचे अधिवक्ता शरीफ शेख यांनी न्यायालयाला विनंती केली की त्याने तुरुंगात घालवलेल्या वेळेपर्यंत शिक्षा द्यावी, हा गुन्हा प्रत्यक्षात घडला नव्हता. आपले वय आणि शैक्षणिक पात्रतेचा दाखला देत त्याने तुरुंगात आणखी वेळ घालवल्यास आपले भविष्य खराब होईल, अशी विनंती केली. शेख यांनी असेही सांगितले की, अन्सारीचे कुटुंब गरीब होते आणि त्याचे वडील चौकीदार म्हणून काम करत होते. परंतु न्यायाधीशांनी शिक्षा कमी करणारी परिस्थिती नैसर्गिकपणे राष्ट्राच्या सुरक्षेच्या किंमतीवर असू शकत नाही, असे नमूद केले आह

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news