मुंबई : लाल मिरचीचे दर तेजीत; मसाल्याचा लागलाय ठसका

मुंबई : लाल मिरचीचे दर तेजीत; मसाल्याचा लागलाय ठसका

नवी मुंबई; वार्ताहर :  आवक कमी असल्यामुळे लाल मिरच्यांच्या वाढत्या दरांचा ठसका सर्वसामन्यांना ठसका जाणवू लागला आहे. गेल्या वर्षीच्या मानाने या वर्षी लाल मिरचीच्या दरात २० ते २५ टक्कयांनी भाव वाढ झाली आहे. पावसाळा संपल्यांनतर महिलांची मसाला तयार करण्यासाठी लगबग सुरू होते. मात्र वाशीतील घाऊक मसाला बाजारात नवीन लाल मिरचीची आवक अद्याप सुरु झाली नसून फेब्रुवारी महिन्यापासून नवीन मिरचीची आवक सुरु होईल. नवीन मिरचीला देखील कनार्टक व आंधप्रदेश मध्ये झालेल्या अवकळी पाऊसांचा फटका बसल्याने दरात तेजीच राहणार असल्याचे संकेत व्यापाऱ्यांनी दिले.

एरवी मिरचीच्या १० ते १२ गाड्या दर दिवसाआड येत असतात, मात्र ही आवक कमी झाली असून ते ७ गाडी बाजारात येत आहे. फेब्रुवारी महिन्यापासून नवीन मिरची बाजारात येण्यास सुरुवात होईल. यावर्षी लवंगी मिरची २०० ते २५०, बेडकी ३५० ते ४५०, पांदी मिरची १५० ते २०० आणि काश्मिरी मिरची ४५० ते ५५० रुपये किलो झाली आहे. गेल्या वर्षी हे दर ३० ते ४० रुपयांनी कमी होते. तसेच, हळकुंड १५० ते २०० रुपये किलो आहे, तर धणेही १२० ते २०० रुपये किलोच्या घरात आहेत. मसाल्यासाठी लागणाऱ्या अख्खा मसाल्याचे दर मात्र स्थिर आहेत. यानुसार दालचिनी २५० ते ५०० रुपये किलो, लवंग ८०० ते १२०० रुपये किलो, इलायची १७०० ते दोन हजार रुपये किलो, काळी मिरी ४५० ते ७०० रुपये किलो, तेजपान १२० ते १४० रुपये किलो, चक्रीफूल ४०० ते ६०० रुपये किलो आहे, अशी माहिती व्यापारी हरमित यांनी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news