राज्यातील 800 संस्थांना तीन कोटींचे अर्थसहाय्य; निवडणूक निधीसाठी राज्य बँकेकडून मदत

राज्यातील 800 संस्थांना तीन कोटींचे अर्थसहाय्य; निवडणूक निधीसाठी राज्य बँकेकडून मदत

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  आर्थिकद़ृष्ट्या कमकुवत असलेल्या राज्यातील 11 जिल्ह्यांमधील 798 विविध कार्यकारी संस्थांना निवडणूक निधीपोटी राज्य सहकारी बँकेने 2 कोटी 93 लाख 31 हजार 387 रुपये अर्थसहाय्य केले आहे. सदर निधी या संस्थांच्या खात्यावर वर्गही केला आहे.

सहकारातील रचनेमध्ये राज्य सहकारी बँक ही शिखर संस्थेची भूमिका बजावत आहे. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँका व विविध कार्यकारी संस्थांचा क्रमांक लागतो. राज्यामध्ये सध्या 21 हजार विविध कार्यकारी संस्था कार्यरत आहेत. त्यापैकी 11 जिल्ह्यांतील एकूण 798 विविध कार्यकारी संस्थांची आर्थिक स्थिती कमकुवत असल्यामुळे या संस्थांच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत.

निवडणूक निधीअभावी 798 प्राथमिक सहकारी कृषी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामध्ये औरंगाबाद 75, बुलढाणा 61, धुळे 10, जालना 100, जळगाव 7, नागपूर 77, नांदेड 235, उस्मानाबाद 119, परभणी 1, वर्धा 11; तर बीडमधील 102 संस्थांचा समावेश आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आर्थिकद़ृष्ट्या अडचणीतील विविध कार्यकारी संस्थांच्या निवडणुका तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news