मुंबई पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके यांची आज त्यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. तसेच मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांचे शुभाशीर्वादही घेतले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी डाके यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांना निरोगी दीर्घायुष्य मिळावे, अशी मनोकामना व्यक्त केली. यावेळी शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर, आमदार संजय शिरसाट आणि माजी आमदार अशोक पाटील हेदेखील सोबत उपस्थित होते.
हेही वाचा