मुंबई : शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपचा दीपोत्सव!

मुंबई : शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपचा दीपोत्सव!
Published on
Updated on

मुंबई;  पुढारी वृत्तसेवा :  शिवसेनेचा बालेकिल्ला काबीज करण्यासाठी भाजपने सर्व सणच हायजॅक केले आहेत. गणेशोत्सवात कोकणी चाकरमान्यांसाठी सोडलेल्या मोफत एसटी बस, सर्व उपनगरात ठिकठिकाणी केलेले
दहीहंडी उत्सव, नवरात्र उत्सवात सर्वाधिक मराठी लोकवस्ती असलेल्या काळाचौकी अभ्युदय नगर येथे आयोजित केलेला मराठी गरबा तर आता वरळी जांबोरी मैदान येथे दीपोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

मुंबईत पूर्वी प्रत्येक सणावर शिवसेनेचाच पगडा असायचा, गुढीपाडवा, दिवाळी असो अथवा दहीहंडी यात शिवसेना नेहमीच आघाडीवर होती. कोरोना महामारीमध्ये दोन वर्ष गेल्यानंतर यंदा प्रथमच कोरोना मुक्त सण साजरे होत आहेत. पण हे सण भारतीय जनता पार्टीने पूर्णपणे हायजॅक केले, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

विशेष म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला व सर्वाधिक मराठी लोकवस्ती विभागात हे सण भाजपातर्फे धुमधडाक्यात
साजरे होत आहेत. मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मराठी लोकवस्तीत स्वत…चा ठसा उमटवण्यासाठी भाजपतर्फे या सणांचे आयोजन करण्यात येत असल्याचे स्पष्ट होते. मुंबईत सुमारे 300 पेक्षा
जास्त ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून, पहिल्यांदा हा उत्सव भाजपने हायजॅक केला.

गणेशोत्सवात भाजपने मुंबई शहर व उपनगरात सर्वाधिक मराठी लोकवस्ती असलेल्या भागातून 150 मोफत बस सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात सोडल्या. शनिवारपासून संपूर्ण मुंबई शहरामध्ये किमान 233 ठिकाणी भाजपातर्फे दिवाळी पहाट व प्रकाशोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यामुळे हा दिवाळी सणही भाजपानेच हायजॅक केल्याचे दिसून येते.

  • लालबाग, परळ, काळाचौकी, चिंचपोकळी, लोअर परेल या मराठी लोकवस्तीमध्ये गायक अवधूत गुप्ते यांच्या मराठी गरब्याचे आयोजन करून हजारो रुपयांची बक्षिसे वाटण्यात आली. या मराठी दांडियालाही या भागातील मराठी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
  • शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या वरळी जांभोरी मैदानात पाच दिवसाचा दीपोत्सव आयोजित करण्यात आला
    आहे. विविध खाद्यपदार्थाची हॉटेल, दुकाने व सुमधुर गाण्यांची मैफिल आयोजित करण्यात आली आहे. 19
    ते 23 ऑक्टोबर दरम्यान हा दीपोत्सव चालणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news