मुंबई : शाळकरी मुलीवर सुरक्षा रक्षकाकडून लैंगिक अत्याचार

संग्रहित
संग्रहित
Published on
Updated on

मुंबई;  पुढारी वृत्तसेवा :  लहान बहिणीची वाट बघत इमारतीखाली उभ्या असलेल्या 11 वर्षीय शाळकरी मुलीला नराधम सुरक्षा रक्षकाने टॅक्सीच्या मागे नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी डोंगरीमध्ये घडली. स्वामी कृष्णाचार्यजी महाराज (58) असे आरोपी सुरक्षा रक्षकाचे नाव असून डोंगरी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

कुलाबा परिसरात रहात असलेल्या 30 वर्षीय तक्रारदार यांचे पती टॅक्सीचालक आहेत. या दाम्पत्याला 11 आणि 8 वर्षांच्या दोन मुली
आहेत. दोन्ही मुली डोंगरी येथील शाळेत अनुक्रमे सहावी आणि चौथी इयत्तेत शिक्षण घेत आहेत. तक्रारदार यांच्या घरापासून शाळा लांब असल्याने या दोन्ही मुली शाळा आणि शिकवणीला जाऊन आल्यानंतर शाळेच्या मागे रहात असलेल्या नातेवाईक महिलेकडे थांबतात. रात्री साडे आठच्या सुमारास तक्रारदार या नातेवाईक महिलेकडे जाऊन दोन्ही मुलींना आपल्या घरी आणतात.

नेहमीप्रमाणे 12 ऑक्टोबरला दोन्ही मुली शाळेत गेल्या होत्या. शाळेत परीक्षा सुरु असल्याने 11 वर्षीय मुलगी लवकर नातेवाईकाच्या घरी
गेली. तर, सायंकाळच्या सुमारास नातेवाईक महिलेला मार्केटमध्ये जायचे असल्याने तिने 11 वर्षीय पीडित मुलीला इमारतीखाली थांबून
शिकवणीवरुन येणार्‍या लहान बहिणीची वाट बघण्यास सांगितले. या ठिकाणाच्या समोर बांधकामाधीन इमारतीच्या ठिकाणी आरोपी
महाराज सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. त्याची एकट्या उभ्या असलेल्या या मुलीवर वाईट नजर पडली. महाराज याने या मुलीला हाक मारुन बोलावले. मात्र मुलीने त्याला येण्यास नकार दिला. अखेर महाराज याने या मुलीचा हात पकडून तिला टॅक्सीच्या आडोशाला नेले आणि तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

नेमक्या त्याचवेळी नातेवाईक महिला तेथे आली आणि पीडित मुलीने नराधम महाराज याच्या तावडीतून पळ काढला. त्यानंतर पीडित मुलीने सुरक्षा रक्षकाने आपल्यासोबत केलेले कृत्य नातेवाईक महिलेला सांगितले. तेवढ्यात पीडित मुलीची आई तेथे पोहचली. नातेवाईक महिलेने घडलेला प्रकार तिला सांगितला. त्यानंतर तिने याची माहिती पोलिसांना दिली. डोंगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महाराज याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर पीडित मुलीच्या आईची फिर्याद नोंदवून घेत याप्रकरणी भादंवि आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून महाराज याला अटक केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news