मुंबई विमानतळावरून जानेवारीत 40 लाख 50 हजार प्रवाशांची ये-जा

मुंबई विमानतळावरून जानेवारीत 40 लाख 50 हजार प्रवाशांची ये-जा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्यात मुंबई विमानतळावरून तब्बल 40 लाख 50 हजार प्रवाशांनी ये-जा केली आहे. या महिन्यात आंतरराष्ट्रीय मार्गावर 10 लाख 20 हजार, तर देशांतर्गत 30 लाख 20 हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. जानेवारी 2022 च्या तुलनेत यंदाच्या जानेवारी महिन्यात मुंबईत विमानतळावरील प्रवासी संख्येत तब्बल 149 टक्यांनी वाढ झाली आहे.

देशातील दुसरे सर्वात व्यस्त विमानतळ म्हणून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ओळखले जाते. कोरोनाचे संक्रमण घटल्यानंतर मुंबई विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या संख्येत दिवसागणीक वाढ होत आहे. जानेवारी महिन्यात एकूण 27 हजार 331 विमानांमधून 40 लाख 50 हजार प्रवाशांनी प्रवास केला. यात आंतरराष्ट्रीय मार्गावर 39 तर देशांतर्गत मार्गावर 61 टक्के प्रवाशांचा समावेश आहे. दररोज किमान 882 विमानांच्या माध्यमातून 1 लाख 40 हजार 641 प्रवाशांनी ये-जा केली. डिसेंबर महिन्यात मुंबई विमानतळावरून एका दिवसात सर्वाधिक 1 लाख 50 हजार 988 प्रवाशांनी प्रवास केला होता. दुबई, लंडन आणि अबुधाबी हे आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी तर देशांतर्गत प्रवासासाठी दिल्ली, बेंगळुरू आणि गोवा राज्यात सर्वाधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news