मुंबई : मृत्यूनंतर पोहोचली गोविंदापर्यंत मदत

मुंबई : मृत्यूनंतर पोहोचली गोविंदापर्यंत मदत
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  विलेपार्ले येथील संदेश दळवी (23) या गोविंदाचा सोमवारी रात्री उपचारादरम्यान नानावटी रुग्णालयात मृत्यू झाला. सरकारने जखमी गोविंदांना पाच लाखांची मदत जाहीर केली होती. मात्र, संदेशचा मृत्यू झाला तरी ही मदत त्याला मिळालेली नव्हती. अखेर मृत्यूनंतर दुसर्‍या दिवशी मंगळवारी कुर्ला येथे त्याच्या राहत्या घरी आ. दिलीप लांडे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीचा दहा लाखांचा चेक त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द केला. कुटुंबातील एकाला सरकारी नोकरीचे आश्‍वासन देखील देण्यात आले आहे.

विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी जखमी आणि मृत्यूमुखी गोविंदाबाबत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. मुख्यमंत्री म्हणाले, सर्व जखमी गोविंदावर योग्य उपचार व्हावेत, कुणाचाही मृत्यू होऊ नये, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेने सात अधिकार्‍यांचे पथक नेमले होते. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्यांशी संपर्क साधण्यात आला होता. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना जखमी आणि मृत्यूमुखी गोविंदांना तत्काळ आर्थिक मदत देण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली.

संदेश दळवी हा सायन शंभो गोविंदा पथकाचा गोविंदा होता. विलेपालतील वाल्मिकी चौक, बामनवाडा येथे दहिहंडी फोडताना खाली पडून गंभीर जखमी झाला होता. दहिहंडीचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेसचे विलेपार्ले तालुका अध्यक्ष रियाज शेख यांना विलेपार्ले पोलिसांनी
अटक केली आहे. अटकेनंतर रियाजची स्थानिक न्यायालयाने जामिनावर सुटका केली

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news