मुंबई : मृत्यू रोखण्यासाठी एसी लोकलचा पर्याय

AC Local
AC Local

मुंबई; सुरेखा चोपडे : मध्य आणि पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरून दररोज 75 ते 80 लाख प्रवासी प्रवास करतात. हा प्रवास करताना लोकलमधून पडून शेकडो प्रवाशांचे मृत्यू होतात. 2016 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली होती. त्यामध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे काय उपाययोजना राबविते असा प्रश्न न्यायालयाने विचारला होता. त्यावेळी लोकलमधून होणारे मृत्यू कमी करण्यासाठी बंद दरवाज्यांची लोकल असणे आवश्यक असल्याचे मत पुढे आले. साध्या लोकल गाड्यांना स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा पर्याय समोर आला. मात्र हा प्रयोग फसला. त्यातून उपनगरीय रेल्वे मार्गावर एसी लोकल चालविण्याचा निर्णय झाला.

एसी लोकल स्वस्तगेल्या वर्षी जून महिन्यात रेल्वेने घेतलेल्या आनलाईन सर्व्हेक्षणात 90 टक्के प्रवाशांनी एसी लोकलच्या तिकिट दरात कपात करण्याची मागणी केली होती. त्यानुसार रेल्वे बोर्डाने मेट्रोच्या धर्तीवर पाच मे पासून एसी लोकलच्या तिकिट दरात 50 टक्के कपात केली. एसी लोकलचा प्रवास स्वस्त झाल्याने लग्नकार्य, खरेदी, महाविद्यालयीन विद्यार्थी, बॅका आणि इतर खासगी कर्मचारी एसी लाोकलकडे वळू लागले. आोलाउबेरच्या व्यवसायावर त्याचा मोठा परिणाम होताना दिसून येत आहे.ओला-उबेरचा दर हा एसी लोकलपेक्षा दहापट जास्त आहे. दर जास्त आणि त्यातच शहरातील वाहतूक कोडींची समस्या यामुळे ओला-उबेरवाला मुंबईकर आता एसी लोकलने प्रवास करण्यास पसंती देऊ लागले आहेत. यामुळे पैशांची आणि वेळेची बचत होऊ लागली आहे. एसी लोकलचे तिकिट दर स्थिर आहेत. तर ओला-उबेरचे दर मागणी आणि पुरवठा यावर ठरतात. त्यामुळेच एसीचे प्रवासी वाढत आहेत. सीएसएमटी ते कल्याण एसी लोकलचा मासिक पास तीन हजार 155 रुपयांना आहे. या मासिक पासमध्ये 50 फेर्‍या ग्राह्य धरल्या जातात. म्हणजेच एका फेरीला 53 रुपये प्रवाशांना खर्च येतो. एका किलोमीटरला 70 पैसे पडतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news