मुंबई : भूखंड, घरे खरेदी-विक्रीत १०० कोटींचा घोटाळा

file photo
file photo

मुंबई/बेलापूर : पुढारी वृत्तसेवा : भूखंड विक्री आणि स्वस्त दरात घर देतो असे सांगून मेसर्स इंडिया लड कंपनीचे मालक सुधीर गव्हाळ यांनी नवी मुंबई सह विविध शहरांत नागरिक आणि बँकांना तब्बल 100 कोटींच्या जवळपास गंडा घातल्याचा धक्कादाय प्रकार समोर आला आहे. फसवणूक प्रकरणी त्याच्यावर राज्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल असून नुकताच भूखंड विक्री प्रकरणी त्यांच्यावर कलम 420 अंतर्गत वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आरोपी सुधीर गव्हाळ असे या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. तो नवी मुंबईत राहतो. मेसर्स इंडिया लड कंपनीसह इतर कंपन्यांचाही तो मालक असून या कंपन्यांच्या माध्यमातून त्याने अनेकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्यावर संगमनेर सत्र न्यायालयात अशोक सहकारी बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी सुनावणी सुरू आहे. अहमदनगर चीफ ज्युडिशिअल समोर प्रकरण सुरू आहे.

ठाणे न्यायालयात दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन विरुद्ध प्रकरण सुरू आहे. असे विविध प्रकारचे खटले त्याच्यावर अनेक वर्षांपासून सुरू असून त्याने गुन्ह्यांचा कहरच गाठला आहे. अनेक गुन्हे न्यायप्रविष्ट असून त्याचा अजून बहुतांश गुन्हे न्यायदरबारी जाण्यासाठी सज्ज झाले आहेत.

गव्हाळविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सीबीडीमधील एका बांधकाम व्यावसायिकाला जमीन खरेदी-विक्रीच्या नावाखाली गंडा घातला असता त्याने गव्हाळविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्यावर आणखी एक गुन्हा न्यायदरबारी दाखल झाला. तसेच एपीएमसी पोलीस ठाण्यात फसवणूक झालेल्या काही जणांनी धाव घेतली असता त्या ठिकाणीही गुन्हा दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सामान्य नागरिकांना जमीन खरेदी-विक्रीतून तसेच स्वस्तात घर घेऊन देतो सांगून गंडा घालायचा असा नित्यनियमच त्याने बनवला असून त्याला पोलीस विभागातील काही उच्च वरदहस्त असल्याची चर्चा सुरू आहे.

आरोपी गव्हाळकडून फसवणूक झालेल्यांची संख्या मोठी असून त्याच्यावर विविध ठिकाणी आणखी गुन्हे दाखल होण्याची चिन्हे आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news