मुंबई पालिका शाळेच्या विद्यार्थ्याचे यूट्यूबवर ३ लाख सबस्क्रायबर्स

मुंबई पालिका शाळेच्या विद्यार्थ्याचे यूट्यूबवर ३ लाख सबस्क्रायबर्स

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबई महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर येथील मुंबई पब्लिक स्कूल माध्यमिक शाळेत दहावीमध्ये शिकत असलेल्या अंकित सिंग या विद्यार्थ्यांने यूट्यूब सबस्क्रायबर्सचा ३ लाखांचा टप्पा पार केला आहे. त्याबद्दल त्याला यूट्यूबकडून सिल्वर बटन मिळाले आहे.

गरीब आणि खडतर आर्थिक परिस्थिती असलेल्या अंकितने नववी, दहावीच्या अभ्यासासोबत, यूट्यूबचे व्हिडियो बनवत हा टप्पा अवघ्या २ वर्षांत पार केला आहे. कोविड काळात मुलांना ऑनलाईन अभ्यासाशिवाय पर्याय नव्हता, मात्र तेव्हाच अनेक विद्यार्थी ऑनलाईन अभ्यासामुळे कंटाळली होती. अशातच अंकितने विरंगुळा म्हणून यूट्यूबवर विविध गेम आणि त्याचे कोडिंग करायला सुरुवात केली. हळूहळू यूट्यूबवरील अन्य व्हिडीओ पाहून त्याने 'अंकित गेमर्ज' नावाने स्वतःचे यूट्यूब चॅनेल तयार केले. ऑनलाईन अभ्यास करता करता अंकित रोज १ ते २ नवीन व्हिडियो आपल्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड करू लागला. पाहता पाहता अंकितच्या यूट्यूब चॅनेलने ३ लाख ४२ हजार सबस्क्रायबर्सचा टप्पा गाठला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news