मुंबई : दिवाळीच्या मुहूर्तावर कोल्हापूर, सांगली आगारांसाठी नव्या 110 परिवर्तन बसेस

मुंबई : दिवाळीच्या मुहूर्तावर कोल्हापूर, सांगली आगारांसाठी नव्या 110 परिवर्तन बसेस
Published on
Updated on

मुंबई; सुरेखा चोपडे :  ग्रामीण भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी एसटी महामंडळाने आपल्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील 500 बी एस-6 प्रणालीच्या साध्या बस घेण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी पहिल्या टप्यातील 110 बस दिवाळीच्या मुहूर्तावर एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. या बस कोल्हापूर आणि सांगली आगारांना देण्यात येणार आहेत, तर पुणे व सांगली विभागांसाठी प्रत्येक 60-60 बसची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, या वर्षअखेरीस आणखी 120 बस एसटीच्या ताफ्यात येणार आहेत. यामुळे ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.

एसटीच्या ताफ्यात 15 हजार 500 बस असून यात साध्या बस, निमआराम, स्वमालकीच्या व भाडेतत्त्वावरील शिवशाही, शिवनेरी, अश्वमेध गाड्या आहेत. आता महामंडळाच्या राज्यातील सात विभागांकरिता साध्या बस पाच वर्षांकरिता भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. भाडेतत्त्वावर बस पुरविणे, त्याचे चालक, डिझेल आणि देखभालीची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असणार आहे.

खर्च टाळण्यासाठी भाडेतत्त्वावरील बस

एसटीचे आयुर्मान संपताच त्या भंगारात काढून त्याबदल्यात बांधणी करून नवीन गाड्या ताफ्यात येतात. वर्षाला आयुर्मान संपलेल्या गाड्यांची संख्या अधिक आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत नवीन गाड्या दाखल झाल्या नाहीत. त्यामुळे बसची बांधणी करणे व त्याच्या देखभालीसाठी येणारा खर्च टाळण्यासाठी भाडेतत्त्वावर गाड्या घेण्याचा पर्याय पुढे आला.

  • 12 मीटर लांबीच्या या बसची प्रवासी वाहून नेण्याची क्षमती 44 + 13 (13 उभे राहून) अशी 57 इतकी आहे. या बस प्रामुख्याने लांब पल्ला अथवा किमान 50 कि.मी. (एकेरी) अंतरावरील शटल सेवा यासाठी वापरण्यात येणार आहेत.
  • चालकाच्या डाव्या बाजूला फोल्डिंगचा एकच दरवाजा असून त्या दरवाजाचे (उघड-झाप) नियंत्रण चालकाकडे असणार आहे.
कोणत्या विभागाला किती बस?

धुळे 100, लातूर 60, सांगली 110, कोल्हापूर 60, रत्नागिरी 50, रायगड 50, पुणे 60.

उत्पन्न : टाळेबंदीपूर्वी एसटीमधून दिवसाला 60 लाख प्रवासी वाहतुकीतून 22 कोटी रुपये उत्पन्न मिळायचे. आता 13 हजार बसमधून सुमारे 28 ते 29 लाख प्रवाशांच्या वाहतुकीतून 14 कोटी रुपये उत्पन्न मिळत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news