मुंबई : एनसीबीकडून आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश

संग्रहित फोटो
संग्रहित फोटो
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) एक मोठी कारवाई करत देशांतर्गत
आणि आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटचा भांडाफोड केला आहे. एनसीबीने या कारवाईत मुख्य सूत्रधारासह रॅकेटमधील प्रमुखांना गजाआड केले आहे.

एनसीबीने पहिल्या कारवाईमध्ये  ट्रान्स –  नॅशनल ड्रग्ज  सिंडिकेटचा पर्दाफाश करत दिल्लीतून 04.984 किलो आणि मुंबईत 02 किलो कोकेन जप्त केले आहे. यात एनसीबीने 2 महिला आणि 3 पुरुषांना अटक केली असून
यातील चार जण विदेशी नागरिक आहेत. आरोपींजवळून जप्त करण्यात आलेले कोकेन हे इथिओपिया येथून आणण्यात आले होते. ते दिल्ली, महाराष्ट्र, गोवा, पंजाब, हरियाणा आणि कर्नाटक येथे वितरित करण्यात येणार होते. त्या आधीच एनसीबीच्या पथकाने छापेमारी करुन हे ड्रग्ज जप्त केले आहे.

नवी दिल्लीतील टिळक नगर भागात कारवाई करत एका महिलेला ताब्यात घेतले. तिच्याजवळील ट्रॉली बॅगमधून 04.984 किलो कोकेन जप्त केले. या महिलेला ट ्रॉली बॅग देणार्‍या इथिओपियन नागरिकांना अटक केली.
कोकेन ड्रग्ज तस्करीचे हे सिंडिकेट संपूर्ण भारतात पसरले असून मुंबई आणि दिल्ली ही दोन शहरे या ड्रग्ज तस्करांचे प्रमुख कार्यक्षेत्र असल्याचे उघड झाले.

मुंबईतील मस्जिद बंदर येथील हॉटेलमधून ड्रग्ज तस्करीची माहिती एनसीबीला मिळाली. एनसीबीच्या पथकाने या हॉटेलमधून आणखी एका महिलेसह दोघांना अटक केली. या आरोपींकडील ट्रॉली बॅगमध्ये 2 किलो कोकेन
सापडले.

अमली पदार्थांचे तस्कर हे आफ्रिकन देशांतील नागरिकांचा ड्रग्ज वाहक म्हणून वापर करत आहेत. तपास यंत्रणांना चकवा देण्यासाठी ते सतत विमानतळे बदलत आहेत. एनसीबीने अटक केलेले हे ड्रग्ज वाहक पहिल्यांदाच भारतात आले होते. मुख्य हँडलर आणि इथिओपियातील आठ ते दहा ड्रग्ज कॅरिअर्सच्या गटाची बैठक झाली. त्यानंतर प्रत्येकाला त्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानुसार हे तस्कर वेगवेगळ्या शहरांमध्ये उतरले. या सिंडिकेटचे व्यवस्थापन नायजेरियन अमली पदार्थ तस्कर करत होते. यात दिल्लीतून अटक केलेली महिला ही दिल्लीतील
सिंडिकेट चालवणार्‍या मुख्य तस्करापैकी एकाची पत्नी आहे. तिच्यावर मुंबईतील ड्रग्ज तस्करांकडून ड्रग्ज घेऊन दिल्लीत नेण्याची आणि अन्य तस्करांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

एनसीबीने दुसर्‍या कारवाईमध्ये अहमदाबादमधून मुंबईतील बोरिवलीमध्ये आणण्यात आलेल्या 7 हजार 500 नेट ्राझेपमच्या गोळ्या जप्त केल्या असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

  •  ड्रग्ज तस्करांच्या प्रमुखांनी भारतीय मुलींशी विवाह केले असून त्यांची कुटुंबे भारतात वास्तव्यास आहेत. विवाह केलेल्या भारतीय महिलांचा अमली पदार्थांची खेप आणि तस्करी करण्यासाठी, ड्रग्ज साठवण्यासाठी आणि तस्करांना आश्रय देण्यासाठी वापर केला जात असल्याचे एनसीबीच्या तपासात समोर आले आहे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news