जोगेश्वरी; पुढारी वार्ताहर : गोरेगाव आरे जंगलातील कारशेडला पर्यावरण प्रेमी संघटनांकडून विरोध सुरूच असून राज्यात सत्तांतर झाल्यापासून 'आरे जंगल बचाव' मोहीमेने अधिक जोर पकडला आहे. सलग नऊ रविवारी कारशेडविरोधात पर्यावरणप्रेमींनी आंदोलन करून राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
मेट्रो कारशेडचे काम सुरू असल्यामुळे पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. आरे जंगल वाचवावा, या मागणीसाठी पर्यावरणप्रेमींकडून प्रत्येक रविवारी आंदोलन करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर देखील आंदोलन करण्यात आले होते. रविवारी सकाळी आरे बिरसा मुंडा चौकात आंदोलक जमा झाल्याचे पाहायला मिळाले. आंदोलकांनी हातात पोस्टर घेऊन जोरदार घोषणाबाजी केली.