

मुंबई; पुढारी ऑनलाईन : कानशिलात वक्तव्यावरून अडचणीत आल्यानंतर अटक झालेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयातील निकाल माझ्या बाजूने लागला असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. मी असं काय बोललो ज्याचा शिवसेनेला राग आला? अशी विचारणा त्यांनी केली.
देश कायद्याने चालतो हे सिद्ध झालं असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी अनेक वक्तव्ये केली असल्याचे ते म्हणाले. माझ्या चांगूलपणाचा फायदा घेत जात असल्याचा आरोप त्यांनी केला.