महाड : तळीये गावाला मुख्यमंत्र्यांची भेट; ग्रामस्थांना मदतीचे आश्वासन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये गावात जाऊन पाहणी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये गावात जाऊन पाहणी केली.

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाड तालुक्यात दुर्घटनाग्रस्त तळीये गावात दाखल झाले. त्यांनी दरड पडलेल्या ठिकाणी पाहणी केली. त्यांच्याबरोबर मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री आदिती तटकरे तसेच खासदार सुनील तटकरे हे देखील उपस्थित आहेत. मुख्यमंत्री पाहणी करत असताना जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये गावाला भेट देऊन पाहणी केली. अतिशय दुर्गम भागातील या गावात शासन सर्व मदत करेल, असे ग्रामस्थांना सांगितले.

तळीये गावात दरडी कोसळून मोठी जिवितहानी झाली आहे. महाड तालुक्यातील तळीये गावात गुरुवारी कोसळलेल्या दरडीमध्ये 49 जणांचा मृत्यू झाला आहे.

पोलादपूर येथील पडलेल्या दरडीमध्ये ११ असा एकूण ६० जणांचा बळी गेला आहे.

पोलादपूर येथील किरकोळ जखमींना महाड, पोलादपूर, माणगाव आणि एमजीएम येथील रुग्णालयात दाखल केले आहे. गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीने रायगड जिल्ह्याला चांगलेच झाेडपले आहे.

अतिवृष्टीने आलेल्या पुराचा सर्वाधिक फटका हा महाड तालुक्याला बसला आहे. महाड आणि पोलादपूर तालुक्यात दरडी पडण्याच्या घटना घडल्या.

महाड तालुक्यातील तळीये या गावात गुरुवारी सांयकाळी चार वाजण्याचा सुमारास दरड कोसळली होती.

याची माहिती प्रशासना सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास मिळाली. त्यानंतर बचावकार्य हाती घेण्यात आले.

परंतू पावसाचा जोर, पुराचे पाणी, मार्गात दरडी पडल्याने घटनास्थळी पोचण्यात अडचणी येत होत्या. पाचाड मार्गेही दरड कोसळली होती. त्यामुळे अडथळा निर्माण झाला होता.

 हे ही वाचलं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news