

मुंबई : घुसखोरीच्या अवैध मार्गाने भारतात प्रवेश करून ट्रॉम्बे परिसरात राहत असलेल्या एका 41 वर्षीय बांगला देशी नागरिकाला घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. अन्वर हुसेन मोहम्मद उल्ला असे या बांगला देशी नागरिकाचे नाव आहे. बांगला देशी घुसखोर हा घाटकोपर पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्गावर असलेल्या एका हार्डवेअरच्या दुकानात येणार असल्याची माहिती दहशतवादविरोधी कक्षाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव अन्वर उल्ला असल्याचे सांगितले आहे.