फुलपाखरांच्या प्रजातीचे संवर्धन आणि संरक्षणासाठी रेल्वेने उभारले उद्यान

फुलपाखरु उद्यान
फुलपाखरु उद्यान

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मध्य रेल्वेने वाडीबंदर येथे फुलपाखरु उद्यानाची निर्मिती केली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात प्रथमच अशा प्रकारचे उद्यान तयार करण्यात आले आहे. नष्ट होत असलेल्या फुलपाखरांच्या प्रजातीचे संवर्धन आणि संरक्षण करण्यात येणार आहे. प्रदुषण कमी करण्यासाठी रेल्वे नेहमीच विविध उपक्रम राबविते.

पर्यावरण दिनानिमित्त मध्य रेल्वेने ङ्गगो शून्यफ या सामाजिक संस्थेच्यामदतीने वाडी बंदर येथील पूर्वीच्या डंपिंग ग्राउंडमध्ये फुलपाखरु उद्यानाची निर्मिती केली आहे. सुमारे दोन हजार चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेल्या वाडीबंदर येथील नवीन कोचिंग कॉम्प्लेक्सजवळ असलेल्या या बटरफ्लाय गार्डनमध्ये डार्क ब्लू टायगर (तिरुमाला लिम्नियास), ब्लू मॉर्मन, टाऊनी राजा (कॅरेक्सेस बर्नार्डस), स्ट्रीप्ड टायगर (डॅनॉस जेन्युटिया), ऑर्किड टिट, कॉमन जेझेबेल (डेलियास युकेरिस), टॉनी कोस्टर (अक्रेआ व्हायोले) आणि प्रतिबंधित स्पॉटेड आणि फ्लॅट अशा 400 हून अधिक प्रजातींच्या वनस्पतींचा संग्रह आहे. चंपा, जास्वंद, तगर, अनंता, मोगरा, कणेर, लंटाना, जमैकन स्पाइन, कामिनी, लिली, अबोली इत्यादी वनस्पतींच्या प्रजाती फुलपाखरांना आकर्षित करण्यासाठी ओळखल्या जातात. मुंबईत फुलपाखरांच्या 150 प्रजाती आढळतात. मध्य रेल्वेने सीएसएमटी आणि इगतपुरी येथे हर्बल गार्डन्स आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे मियावाकी वृक्षारोपण उपक्रम हाती घेतला आहे.

सीएसएमटी आणि इगतपुरी येथील वनौषधी उद्यान आणि इगतपूरी येथे सुमारे 120 आणि 470 हून अधिक विविध प्रजातींच्या वनौषधी आणि झुडपांचा संग्रह आहे. एशगंधा, अडुसा, अजवाईन, अपमार्ग, ब्राम्ही, इलाची, मेन्थॉल मिंट, मिरपूड, शतावरी, तुळशी, अंजीर, हळद, इन्सुलिन, गुडमार, तेजपट्ट, ब्रिंगराज, सरपा गंधा, गिलोई अशा वनौषधींचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news