पं.हरिप्रसाद चौरसियांना लता मंगेशकर पुरस्कार

पं.हरिप्रसाद चौरसियांना लता मंगेशकर पुरस्कार
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : ख्यातनाम बासरीवादक पं.हरिप्रसाद चौरसिया यांना राज्य शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार (2021-22) जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी मंगळवारी याबाबतची घोषणा केली.

शास्त्रीय संगीत क्षेत्रात गायन आणि वादन यामध्ये प्रदीर्घकाळ उल्लेखनीय कार्य केलेल्या कलाकारांना भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार दिवंगत पंडित शिवकुमार शर्मा यांना जाहीर करण्यात आला आहे. लोककलाक्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणार्‍या ज्येष्ठ कलाकारास देण्यात येणारा विठाबाई नारायणगांवकर जीवन गौरव पुरस्कार आतांबर शिरढोणकर (2019-20) यांना तर 2020-21या वर्षाचा पुरस्कार संध्या माने यांना जाहीर करण्यात आला आहे.

रंगभूमीवरील प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ नाट्य कलाकारास नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या नावे रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार देण्यात येतो. 2020-21 या वर्षाचा पुरस्कार दत्ता भगत यांना तर 2021-22 या वर्षाचा पुरस्कार सतीश आळेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. संगीत रंगभूमीवरील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ज्येष्ठ नाट्य कलाकारास दरवर्षी संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात येते. 2020-21 या वर्षाचा पुरस्कार लता शिलेदार ऊर्फ दीप्ती भोगले यांना तर2021-22 या वर्षाचा पुरस्कार सुधीर ठाकूर यांना जाहीर करण्यात आला आहे. या पाचही पुरस्कारांचे स्वरुप 5 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे आहे.

सांस्कृतिक क्षेत्रात विशेष कार्य करणार्‍या कलावंत व्यक्तींना सांस्कृतिक राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरुप 1 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे. नाटक या क्षेत्रासाठी 2019-20 साठी कुमार सोहोनी आणि 2020-21 साठी गंगाराम गवाणकर यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कंठसंगीत या क्षेत्रासाठी 2019- 20 साठी पंडितकुमार सुरुसे आणि 2020-21 साठी कल्याणजी गायकवाड यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. उपशास्त्रीय संगीत या क्षेत्रासाठी 2019-20 साठी शौनक अभिषेकी आणि 2020-21 साठी देवकी पंडित यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

शाहिरी या क्षेत्रासाठी 2019-20 साठी शाहीर अवधूत विभूते आणि 2020-21 साठी दिवंगत शाहीर कृष्णकांत जाधव यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नृत्य या क्षेत्रासाठी 2019-20 साठी शुभदा वराडकर आणि 2020-21 साठी जयश्री राजगोपालन यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लोककला या क्षेत्रासाठी 2019-20 साठी सरला नांदुलेकर आणि 2020-21 साठी कमलबाई शिंदे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आदिवासी गिरीजन या क्षेत्रासाठी 2019-20 साठी मोहन मेश्राम आणि 2020-21 साठी गणपत मसगे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कलादान या क्षेत्रासाठी 2019-20 साठी अन्वर कुरेशी आणि 2020-21 साठी देवेंद्र दोडके यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

वाद्यसंगीत या क्षेत्रासाठी सुभाष खरोटे(2019-20) आणि 2020-21 साठी ओमकार गुलवडी यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मराठी चित्रपटासाठी 2019-20 साठी मधु कांबीकर आणि 2020-21 साठी वसंत इंगळे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कीर्तन/समाजप्रबोधन या क्षेत्रासाठी 2019-20 साठी ज्ञानेश्वर वाबळे आणि 2020-21 साठी गुरुबाबा औसेकर यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तमाशा या क्षेत्रासाठी 2019-20 साठी शिवाजी थोरात आणि 2020-21 साठी सुरेश काळे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news